चीनसह कोरियामध्येही कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण!

966

कोरोनाने चीनसह जगभरात थैमान घातले आहे. कोरोनाने चीनमध्ये हाहाकार माजला आहे. मृतांचा आकडा 2788 वर पोहोचला आहे. तर कोरोनाच्या संक्रमणाचे 327 नवीन रुग्ण आढळले आहेत. चीनसह शेजारी देश दक्षिण कोरियातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तेथे दोन हजारहून जास्त संक्रमित रुग्ण आढळले आहेत. कोरियामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे कोरोना आता दक्षिण कोरियातही हातपाय पसरत आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोरियामध्येही उपाययोजना करण्यात येत आहेत.

चीनसह कोरिया, इराण, जपानमध्ये करोनाचा संसर्ग फैलावत आहे. कोरियातील दाएगू शहरात सध्या करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. दाएगू आणि उत्तर ग्योओंग्सांग शहरात कोरोनाचे 90 टक्के रुग्ण आहेत. कोरियात आतापर्यंत 13 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या शहरातील सुमारे सव्वा दोन लाख लोकांची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. दाएगू शहरात करोनाच्या रुग्णात आणखी वाढ होण्याची भीती महापौर क्वोन यंग जिन यांनी व्यक्त केली. जगभरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न होत आहेत. काही देशांना चीनसह आशियातील हवाई उड्डाणांवर बंदी घातली आहे. चीनसह दक्षिण कोरिया, जपान या देशातही कोरोनाचा संसर्ग आढळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जपानमधील टोकियो डिस्नेलँड 15 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. तसेच दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या