15 एप्रिलपासून सेवा सुरू करण्याचं दक्षिण रेल्वेचे ट्विट, गडबड होताच केलं डिलीट

1424

कोरोनाच्या उद्रेकामुळे हिंदुस्थानात संपूर्ण टाळेबंदी म्हणजेच लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. या काळात सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. टाळेबंदीचा काळ वाढवावा अशी काही राज्यांकडून विनंती केली जात आहे. टाळेबंदीचा काळ वाढणार अथवा नाही याबाबत केंद्राकडून अजून घोषणा करण्यात आलेली नाहीये. असं असलं तरी 15 एप्रिलपासून आपली सेवा सुरू होणार असल्याचं एक ट्विट दक्षिण रेल्वेने केलं होतं. एका प्रवाशाने त्याची अडचण रेल्वे प्रशासनाला कळवली होती, त्याला उत्तर देत असताना दक्षिण रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वे प्रशासनाने सेवा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. असं असताना दक्षिण रेल्वेने ट्विट करून 15 तारखेपासून सेवा सुरू होणार ट्विट  केलं. ही बाब आपल्या अंगलट येऊ शकते हे कळाल्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं.

एका प्रवाशाला कोरोनाविरूद्ध सुरू असलेल्या लढ्यात उतरायचे आहे. या प्रवाशाला वैद्यकीय सेवा देणाऱ्यांसाठी दक्षिण रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीला हजर राहायचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असताना आपण मुलाखतीसाठी कसे पोहोचू शकतो असा प्रश्न या प्रवाशाने दक्षिण रेल्वेला ट्विटरच्या माध्यमातून विचारला होता. यावर दक्षिण रेल्वेने त्याला उत्तर देताना दक्षिण रेल्वेची सेवा ही 15 एप्रिलपासून सुरू होईल असं म्हटलं होतं. मात्र नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं

आपली प्रतिक्रिया द्या