अरे बापरे..! देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

2605

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलीगी जमातच्या मरकजला उपस्थित राहिलेल्या लोकांनी देशभरात कोरोना पसरवल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत एक आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हंटले आहे. देशात सध्या कोरोनाचे 2902 रुग्ण असून त्यापैकी 1023 रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तबलिगींमुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली, 14 राज्यात जमातचे 647 कोरोनाग्रस्त सापडले

शनिवारी तबलीगी जमातशी संबंधित 17 रुग्ण सापडले असून यांची संख्या 1023 झाली आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण तबलीगी जमातशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल (Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry) यांनी दिली.

देशात सध्या कोरोनाचे 2902 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात देशातील रुग्णांचा आकडा अचानक वाढला असून 601 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 68 झाला आहे, असेही लव अग्रवाल यांनी सांगितले. 183 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तबलीगी जमातच्या संपर्कात आलेल्या 22 हजार लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

रुग्णांचे वय आणि टक्केवारी
0 ते 20 वय – 9 टक्के
21 ते 40 वय – 41 टक्के
41 ते 60 वय – 33 टक्के
60 वयापेक्षा जास्त – 17 टक्के

आपली प्रतिक्रिया द्या