3888
प्रातिनिधीक फोटो

हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांची संख्या आता झपाट्याने वाढायला लागली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 1397 च्या पार पोहोचला आहे. देशात या आजारामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही 52 झाली आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा तर वाढतोच आहे शिवाय तिथे या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडाही वाढत चालला आहे.  24 तासात अमेरिकेमध्ये तब्ब्ल 884 जणांचा मृत्यू झाला आहे. 9/11 च्या दहशवादी हल्ल्यात तिथे जितके नागरीक मृत्यूमुखी पडले होते त्यापेक्षाही जास्त नागरीक या आजारामुळे दगावले आहेत.

 • गेल्या 24 तासात हिंदुस्थानात 437 कोरोनाग्रस्त आढळले
 • अमेरिकेत गेल्या 24 तासात 884 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
 • धारावीत आढळून आलेल्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून या रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

 • मुंबईतील धारावीमधील शाहू नगरमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. पोलिसांनी हा रुग्ण राहत असलेल्या ईरामतीला सील केले आहे.

 • कोरोना बाधित देशांमधील कोरोना बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं
  असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले.
 • दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण
 • महाराष्ट्रात पाच हजारहून अधिक लोकं क्वारंटाईनमध्ये

 • मरकजमध्ये सहभागी झालेले आसाममधील चार जण कोरोना पॉझिटिव्ह
 • दिल्लीतील मरकज इमारतीत निर्जंतुकीकरण केले जात आहे

 • वसईत करोनाचा आठवा रूग्ण आढळला
 • देशातील लॉकडाऊनमुळे दक्षिण मुंबईतील मलबार हिल, बाबुलनाथ परिसर निर्मनुष्य झाल्याने इथ रस्त्यावर मोर दिसायला लागले आहेत.

 • दिल्लीतील मरकजमध्ये गेलेल्या मुंबईतल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू

 • दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची माहिती

 • मरकजमधल्या 617 जणांना रुग्णालयात दाखल केले
 • दिल्लीतील मरकजमधून तब्बल 2300 जणांना बाहेर काढले
 • शिर्डीत साध्या पध्दतीने रामनवमी उत्सव साजरा केला, अधिकाऱ्यांचे हस्ते झाली पूजा
 • 12 तासात कोरोनाग्रस्तांची संख्या 240 ने वाढली
 • देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1466 वर पोहोचला

 • आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात 43 नवे रुग्ण आढळले. कोरोनाग्रस्तांचा आकडा 87 वर
 • बुलढाण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त आढळळा. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण
 • गुजरातमध्ये कोरोनाचे 8 नवीन रुग्ण आढळले
 • दिल्लीत सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण

 • नगरमधील 34 जण निझामुद्दिन मरकजमध्ये झालेले सहभागी, दोघं निघाले कोरोना पॉझिटिव्ह

 • तब्लिघी जमातवर कडक कारवाई करा – मुख्तारअब्बास नक्वी यांची मागणी

 • लातूर जिल्हा बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटी 11 लाख रुपयांची मदत
 • कोरोनाबाबत उपाययोजनांसाठी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचा एक कोटींचा निधी
 • निझामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या संभाजीनगरातील 40 जणांचा शोध घेण्यात येत आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनीवा येथील मुख्यालयातील नऊ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
 • निजामुद्दीन इथल्या मरकजमध्ये पुण्यातील किमान 130 जण गेले होते, त्यातील अनेकांचा थांगपत्ता नाही.

 • निझामुद्दीनवरून आलेल्या पुण्यातील 60 जणांना क्वारंटाईनमध्ये ठेवले
 • बुधवारी म्हणजे आज आणखी 25 जणांची चाचणी होणार

 • कोरोना झाल्याचा संशय असलेल्या गोव्यातील 14 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले
 • दिशाभूल करणारी माहिती देत असल्याने गुन्हा दाखल

 • दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात हे दोघे सहभागी झाले होते
 • फर्जंद अली आणि एस.रहमान या कोरोनाग्रस्तांवर गुन्हा दाखल
 • अंदमानातील 2 कोरोनाग्रस्तांवर गुन्हा दाखल
 • सफाई कर्मचाऱ्यांवर फुलं उधळून कौतुक

 • लॉकडाऊनचा आज 8 वा दिवस आहे
 • 14 एप्रिलपासून देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे
 • दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या 93 जणांना कोरोनाची लागण
 • कोरोनामुळे हिंदुस्थानात 35 जणांचा मृत्यू झाला आहे
 • देशात 124 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत
 • देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1397 झाली
आपली प्रतिक्रिया द्या