कोरोनाने घेतला आजोबा, मुलगा आणि नातवाचा बळी; नेरूळमधील भाजीविक्रेते कुटुंब उद्ध्वस्त

2469

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमधील एका व्यापार्‍याच्या घरातील पिता-पुत्र आणि नातवाचा कोरोनाने एकाच महिन्यात बळी घेतला आहे. घरातील कर्त्या पुरुषांचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटवर शोककळा पसरली आहे. एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये व्यवसाय करणारे हे पिता,पुत्र आणि नातू नेरुळ येथे राहत होते.

गेल्या महिन्यात पित्याला ताप आला असता त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर मुलाची आणि नातवाची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली. एकाच घरात तिघांना कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण कुटुंब प्रचंड तणावाखाली आले होते. या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार सुरू असताना 11 मे रोजी पित्याचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर 23 मे रोजी नातवाची कोरोना बरोबर सुरू असलेली झुंज संपली. या दुःखामधून संपूर्ण कुटुंब सावरत नाही, तोच मुलाचाही कोरोनाने बळी घेतला. एकाच महिन्यात एकाच कुटुंबातील तीन कर्त्या पुरुषांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नवी मुंबईत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सत्तर जणांची को रोना वर्मा को रोना चे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडल्यानंतर एपीएमसीचे पाचही मार्केट बंद करण्यात आली होती सर्वाधिक रुग्ण भाजीपाला आणि धान्य मार्केट मध्ये सापडले होते भाजीपाला मार्केट मधील 70 रुग्णांनी को रोना वर माफ करून पुन्हा मार्केटमध्ये घेण्यास सुरुवात केली आहे

आपली प्रतिक्रिया द्या