Janata Curfew बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्याची जीभ वृद्ध महिलेने चावून तोडून टाकली

3330

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी रविवारी देशभरात ‘जनता कर्फ्यू’ पाळण्यात आला. त्याला उत्तम प्रतिसाद संपूर्ण देशभरात पाहायला मिळाला. मात्र या कर्फ्यूमुळे रस्त्यावर , परिसरात कोणी नाही हे पाहून दोघे जण एका महिलेच्या घरात घुसले. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी या महिलेला धमकावून तिच्या घरात प्रवेश केला.

ही घटना पश्चिम बंगाल इथली असून  इथल्या जलपायगुडी भागात राहणाऱ्या महिलेच्या घरात रॉकी आणि छोटू मोहम्मद घुसले होते. सुरुवातीला घाबरलेल्या 65 वर्षांच्या महिलेने या दोघांचा प्रतिकार करायला सुरुवात केली. वासनेने आंधळ्या झालेल्या या दोघांना या वृद्ध महिलेवर बलात्कार करायचा होता. मात्र या महिलेने दोघांचा कडाडून प्रतिकार केला. ही महिला घरात एकटीच राहाते हे या दोघांना माहिती असल्याने ते या महिलेच्या घरात घुसले होते. महिलेने विरोध केल्याने या दोघांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. रॉकी या महिलेचा आरडाओरडा बंद करण्यासाठी तिच्या जवळ गेला. याचा फायदा उचललत या महिलेने त्याची जीभ चावली आणि त्याचे दोन तुकडे केले. यानंतर हे दोघे पळून गेले. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे की नाही हे अजून कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या