जनता कर्फ्यूमुळे लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजेल!

521

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनला देशभराततून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता कर्फ्यूमुळे लोकांना सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नेमके काय आणि सद्यस्थितीतील त्याचे महत्त्व समजेल. जगभरात कोरोनाचे थैमान सुरू असताना अनेकांना अजूनही सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजलेले नाही. अनेकजण आपल्या राज्यात परतण्यासाठी रेल्वे आणि बसस्थानकात गर्दी करत आहेत, हे अयोग्य असून लोकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

कोरोना रोखण्यासाठी या जनता कर्फ्यूचा चांगला उपयोग होणार आहे. मात्र, दिवसभर सोशल डिस्टन्सिंग केल्याने या साथीचा फैलाव पूर्णपणे थांबणार नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. रविवारचे हे सोशल डिस्टन्सिंग आणखी काही दिवस पाळले गेल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील, असेही तज्ज्ञांनी सांगितले. जनता कर्फ्यू हा एक चांगला प्रयत्न असून यामुळे लोक घरात थांबतील, त्यांचा समाजातील वावर कमी होणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पोहोचत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. फक्त एक दिवस सोशल डिस्टन्सिंगमुळे ही साथ पूर्णपणे थांबेल, असे समजणे अयोग्य असल्याचे मतही तज्ज्ञांनी नोंदवले. जनता कर्फ्यूमुळे कोरोनाचा प्रसाराला आळा निश्चितच बसणार आहे. मात्र, एका दिवसात कोरोनाचे विषाणू नष्ट होणार नसल्याने ही साथ पूर्णपणे थांबणार असल्याच्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

फक्त एक दिवस लोकांशी संपर्क न आल्याने विषाणू नष्ट होतील, याला कोणताही आधार नाही. मात्र, जनता कर्फ्यूमुळे कोरोनाचा फैलाव कमी होण्यास नक्की मदत होणार आहे. पण यामुळे संक्रमणाची साखळी तुटेल, असे समजणे अयोग्य आहे. कोरोनाचे विषाणू 20 ते 22 तासात नष्ट होतात, याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे याबाबतच्या अयोग्य दाव्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये, असे एम्समधील मायक्रोबायोलॉजीच्या माजी प्रमुख डॉक्टर शोभा यांनी सांगितले. मात्र, आगामी काही दिवस सोशल डिस्टन्सिंगचे कठोरतेने पालन केल्यास कोरोना रोखण्यात मोठे यश मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या