Coronavirus मुळे IIFA Awards पुढे ढकलण्याचा निर्णय, मध्य प्रदेशात होणार होता कार्यक्रम

287

Coronavirus news update कोरोनो व्हायरसमुळे मध्यप्रदेशात होणारा IIFA Awards हा चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भोपाळ आणि इंदूरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार होते. 19,20,21 मार्च रोजी या पुरस्कार सोहळा होणार होता. आयफा पुरस्कार हे चित्रपटसृष्टी गेल्या काही वर्षात मानाचे मानले जाऊ लागले आहेत. सर्वसाधारणपणे हा सोहळा परदेशात आयोजित केला जात होता. ही दुसरी वेळ होती जेव्हा हा कार्यक्रम हिंदुस्थानात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडची दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. जवळपास 20 वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जात आहे. विविध देशांमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर हा सोहळा यंदा देशात आयोजित करण्याचं ठरवण्यात आलं होतं. इंदूरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालकन अभिनेता सलमान खान आणि रितेश देशमुख करणार होते. शाहरूख खान, कटरीना कैफ, ह्रितीक रोशन, करीना कपूर हे कलाकार या सोहळ्याच्या मंचावर थिरकणार होते. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भोपाळमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात येणार होता. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचे कार्यक्रम इंदूरमध्ये होणार होते.

आपली प्रतिक्रिया द्या