ब्लड कॅन्सरच्या रूग्णांना चार विविध ट्रेनद्वारे औषधे पोहचली, मध्य रेल्वेच्या पार्सल विभागाची कामगिरी

लॉकडाऊनच्या काळातही बांधिलकी जपत मध्य रेल्वेने कॅन्सर पिडीतांना औषधे देशभर पोहचवून त्यांची सेवा केली आहे. अत्यावश्यक जीवनदायी औषधे विनाविलंब आजारी व्यक्तींच्या दारापर्यंत पोहचविली यात ब्लड कॅन्सरच्या रूग्णासह अन्य कर्करोगाच्या रुग्णांचा समावेश आहे. बेळगाव येथील दोघा ब्लड कॅन्सरच्या चार विविध टप्प्यात प्रसंगी गार्डच्या डब्यातून कॅन्सरची जीवरक्षक औषधे पोहचविण्यात आली.

बेळगावला जाणारी थेट ट्रेन उपलब्ध नसल्याने मुंबईच्या पार्सल शाखेने पार्सल बुकिंगनंतर कर्करोगाची औषधे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पुणे येथे विशेष पार्सल ट्रेनने पाठविली, त्यानंतर कामगारांच्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून ही औैषधे पुण्याहून सातारा येथे गेली. तेथून श्रमिक स्पेशल गाडीच्या गार्डच्या डब्यातून मिरजला ही औषधे पोहचविली. अखेर मिरज ते बेळगाव गूड्स ट्रेनमधील गार्डसच्या डब्यातून ही औषधे तीन ट्रान्स-शिपमेंटच्या टप्प्यांनंतर बेळगाव येथे मध्यरात्री 1.00 वाजता स्थानकातील स्टेशन मास्तरांकडे पोहचली. बेळगावचे 69 वर्षीय प्रकाश माने तसेच भारतीय वायू दलाचे कर्मचारी कपोल रवी यांच्या मातेसाठी पोहचविण्यात आले. संजय पात्रो यांनी ओरिसाच्या कोरापटमधील जयपोर येथे राहणार्‍या सासरे बुवांसाठी औषध हवे असल्याचे ट्वीट केल्याने कोणार्क एक्सप्रेसने ब्रह्मपूर येथे तातडीने औषधे पाठवून देण्यात आली. मुंबई विभागातील पार्सल विभागाचे मुख्य वाणिज्य निरीक्षक जितेंद्र मिश्रा यांनी त्यासाठी पूर्व तटीय रेल्वेचे, खुर्दा रोड येथील मुख्य वाणिज्य निरीक्षक प्रदीप सेनापती यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत विनंती केली.

अशी झाली औषधांची डीलिव्हरी

  • मुंबई ते ब्रह्मपूर 16 जून
  • मुंबई ते बेंगलुरू (सिकंदराबाद – चैनई मार्गे) म्हैसूर 20 मे
  • मुंबई ते बेळगाव 18 मे
  • मुंबई ते बेळगाव 18 मे
  • कांजूरमार्ग ते सोलापूर 11मे
  • कळवा ते विन्हेरे (कोकण विभाग ) 06 मे
  • परळ ते वैभववाडी 06 मे
  • मुलुंड ते गोरखपूर 18 एप्रिल
आपली प्रतिक्रिया द्या