घरात बसूनच भाजप नेत्यांची ममता बॅनर्जी विरोधात निदर्शने

799

देशात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारमध्ये तणाव निर्माण झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेत्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निदर्शने सुरू केलेली आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ही निदर्शने व्हिडीओ द्वारे केली जात आहेत. भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्यासह अनेक नेते या निदर्शनात सामील झाले आहेत. खासदार कैलास विजयवर्गीय यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात इंदूर येथील निवासस्थानावर निदर्शने केली.

विजयवर्गीय म्हणाले आहे की, कोरोनाच्या आड ममता सरकारच्या राजकारणाकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा आजच्या या दोन तासांच्या धरण्याचा उद्देश आहे. त्या कोरोना रुग्णांचा आकडा लपवण्या सोबतच केंद्राद्वारे गरिबांसाठी पाठवण्यात आलेल्या मोफत राशन मध्येही अफरातफरी करत आहेत, असं ते म्हणाले आहेत. कोरोना संदर्भात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नुकतीच केंद्रातील एक पथक उत्तर बंगालमध्ये पोहोचले होते. त्यांनी पश्चिम बंगाल सरकारला उत्तर बंगालमधील लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी एक पत्र लिहिले. उत्तर बंगालला भेट देणाऱ्या पथकाने मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना पत्र लिहून सांगितले होते की, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने घेतलेली विविध पावले किती प्रभावी आहेत. तसेच या गोष्टींची माहिती देण्यासाठी अधिक फिल्ड अधिकारी आवश्यक आल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

दरम्यान कोरोनाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, जाणीवपूर्वक राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत की, पश्चिम बंगालमध्ये कोरोना विषाणू संदर्भात खूप कमी लोकांची तपासणी केली जात आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या