गोमूत्र, गाईच्या शेणाने कोरोना बरा होतो!

1799

जगभरात थैमान घालणारा कोरोना गोमूत्र आणि गाईच्या शेणाने बरा होऊ शकतो, असा अजब दावा भाजपच्या महिला आमदाराने केला आहे. आसाम येथील आमदार सुमन हरिप्रिया यांच्या या दाव्याने शास्त्रज्ञांना धक्का दिला आहे.

आसाम किधानसभेत गाईंचा बांग्लादेशात होणाऱया तस्करीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावेळी हरिप्रिया यांनी हे कक्तक्य केले. कोरोना विषाणूपुढे जगातील शास्त्र्ाज्ञांनी हात टेकले आहेत. या विषाणूवरील लस अजून विकसित झालेली नाही. असे असताना हरिप्रिया यांनी गोमूत्र आणि गाईचे शेण कोरोनावर जालीम उपाय ठरेल, असा दावा केला आहे. कोरोना हा हकेतून पसरणारा आजार आहे. जर होमहकन केले तर हा विषाणू पसरणार नाही, असेही हरिप्रिया यांनी म्हटले आहे. या आधीदेखील भाजपच्या नेत्यांनी अनेकदा गोमुत्र आणि शेणाने अनेक आजार बरे होत असल्याचा दावा केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या