कोरोना लॉकडाऊन; वाढणार सोन्याचे भाव…

8487

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले असून यामुळे देशावर मोठे आर्थिक संकट ओढवलेलेआहे. असे असताना मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नजीकच्या काळात हिंदुस्थानात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 50,000 रुपयांपर्यंत वाढू शकते.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो. बाजारात इतर शेअरचे भाव पडत असताना अनेक लोक सोन्यात गुतणवूक करू शकतात.

अक्षय तृतीयाकडून व्यावसायिकांच्या अपेक्षा

देशातील सराफा व्यापारी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याची वाट पाहत आहेत. कारण देशात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यावर बाजार पुन्हा एकदा सुरु होणार आहे. अशातच सराफा व्यापारी अक्षय तृतीया सणाच्या तयारीला लागणार आहेत. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात येणारा अक्षय्य तृतीया हा सण हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. यावेळी अक्षय तृतीया 26 एप्रिल रोजी आहे. दरवर्षी लोक या निमित्ताने मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी करतात. यंदाही सराफा व्यापाऱ्यांना अशीच अपेक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या