ना लॉकडाऊन, ना बाजार बंद; ‘या’ देशात कोरोनाशी अनोखी लढाई

चीनच्या अगदी जवळ हा देश असूनही या देशात ना बाजार बंद करण्यात आलेत ना लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले आहे. वुहानपासून 1382 किमी अंतरावर असलेला हा देश म्हणजे दक्षिण कोरिया. या देशाचे मॉडेल जगभरात अभ्यासले जात आहे.

कोरोनाग्रस्त देशांमध्ये द. कोरियाचा आठवा क्रमांक लागतो. दक्षिण कोरियात कोरोनाग्रस्तांचा आकडा 9137 इतका आहे. यापैकी 3500 रुग्ण बरे झाले आहेत. 129 जणांचा मृत्यू झाला असून 59 रुग्ण गंभीर आहेत. 8 – 9 मार्च पर्यंत इथे 8000 रुग्ण असल्याचे समोर आले. मात्र गेल्या 2 दिवसांत इथे 13 नवे रुग्ण आढळले. मात्र या देशाने ना बाजार बंद केले ना लोकडाऊन जाहीर केले. त्याऐवजी त्यांनी आपल्या देशाच्या नागरिकांना सवयी बदलण्यावर जोर दिला आणि चोख व्यवस्था उभी केली.

संशयित लोकांच्या तात्काळ वैद्यकीय तपासण्या, चांगले इलाज, 600 हून अधिक तपासणी केंद्र 50 हून अधिक वाहन मार्गावर स्क्रीनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सरकारी कार्यालये, पार्किंग, हॉटेल्सच्या इमारती मध्ये थर्मल स्कॅनर बसवण्यात आले आहेत. वैद्यकीय चाचणी अहवाल अवघ्या 1 तासात प्राप्त होतो.

वारंवार हात धुणे, सॅनेटायझर वापरणे, दोन्ही हाताचा वापर कसा करायचा, चेहऱ्यावर जाऊ नये म्हणून काय करावे हे त्यांनी लोकांना शिकवले. तसेच लोकही सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या