शाब्बास धारावी! कोरोनाविरोधातील लढाईत धारावी देशासाठी रोल मॉडेल

1377

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले एवढेच नाही तर कोरोना विरुध्दच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपले नाव नोंदवले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .

धारावीतील कोरोना नियंत्रणाच्या यशस्वी लढ्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेयेसुस यांनी कौतुक केले आहे. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाब्बास धारावी अशा शब्दात धारावीकरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. महापालिका, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर, हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश आहे. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोनाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे म्हटले आहे.

नियोजनद्ध पावले

धारावीत आम्ही नियोजनबध्द पध्दतीने कोरोना रोखण्याचे ठरवले. त्यात मुख्यमंत्र्यांचे आम्हाला मार्गदर्शन होते. पालिका व खासगी डॉक्टर व एनजीओच्या सहभागामुळे एक उदाहरण निर्माण करता आले अशा शब्दात स्थानिक आमदार व शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी भावना व्यक्त केल्या.

ह प्रो अॅक्टीव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन सेंटर्स यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली.

आपली प्रतिक्रिया द्या