अधिकाऱ्यांना कोरोना, ‘ईडी’ मुख्यालय सील

500

‘कोरोना’चा संसर्ग अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) मुख्यालयापर्यंत पोहोचला आहे. पाच अधिकाऱ्यांना संसर्ग झाल्यामुळे मुख्यालय सील करण्यात आले आहे.

दिल्लीच्या खान मार्केट परिसरात ‘लोकनायक भवन’ हे ईडीचे मुख्यालय आहे. शुक्रवारी पाच अधिकाऱ्यांना कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अधिकाऱयांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रपती भवनातील एका कर्मचाऱयाला कोरोना संसर्ग झाला होता. तसेच परराष्ट्रमंत्रालयातील दोन अधिकारीही पॉझिटिव्ह आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या