विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर भर द्या! गणेशोत्सव आढावा बैठकीत महापौरांचे निर्देश

134

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच कसे होईल, यावर भर द्या. त्यासाठी अधिकाधिक कृत्रिम तलाव तयार करा, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी जी/दक्षिण विभागात झालेल्या आढावा बैठकीवेळी दिले.

वरळी, प्रभादेवी, लोअर परळ या विभागातील गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या पाश्र्वभूमीवर जी/दक्षिण विभागामधील कृत्रिम तलाव तयारी कामांचा महापौरांनी विभाग कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या वेळी महापौर म्हणाल्या, याआधी पारंपरिक पद्धतीने ज्या ठिकाणी कृत्रिम तलावांची र्नििमती करण्यात आली होती त्याच ठिकाणी र्नििमती करा तसेच नवीन ठिकाणी मैदानांमध्ये कृत्रिम तलाव तयार करताना मैदान न खोदता तयार करण्यात येणाऱ्या तलावांची र्निमती करा. हे करताना रहिवाशांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. गणेशमूर्तींचे सहजसुलभ विसर्जन कसे होईल, याकडेही कटाक्षाने लक्ष द्या, त्यासाठी योग्य ते नियोजन करा, असे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला जी/दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त शरद उघडे आणि इतर पालिका अधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेच्या पाठपुराव्याने कुल्र्यात विसर्जनासाठी ; 3 कृत्रिम तलावांची सोय

शिवसेनेच्या पाठपुराव्याने कुर्ला विधानसभाग क्षेत्रात गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या माध्यमातून ३ कृत्रिम तलावांची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे गर्दी टाळण्यासाठी या कृत्रिम तलावांसाठी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी पाठपुरावा केला.

कुर्ला विधानसभा क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (नेहरूनगर), लाल मैदान (टिळक नगर), जेतवन उद्यान येथील मोकळी जागा (सेल कॉलनी ठक्कर बाप्पा) या ठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलाव मंजूर करण्यात आले आहेत. सध्या मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी गणेशोत्सवात होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी विभाग क्र. ६ मध्ये निर्माण करण्यात येणारे कृत्रिम तलाव महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या