डुप्लिकेट सॅनिटायझर ओळखण्यासाठी करा ‘या’ घरगुती चाचण्या

2610

कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर बाजारात हँड सॅनिटायझरची मागणी खूप वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नियमितपणे हँड सॅनिटायझर वापरणे महत्त्वाचे आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक प्रकारचे बनावट हँड सॅनिटायझर बाजारात येत आहेत. त्यामुळे आपण वापरत असलेला सॅनिटायझर बनावट तर नाही ना हे ओळखण्यासाठी काही घरगुती आणि सोफ्या पद्धती आहेत.

भावी सॅनिटायझरची गुणवत्ता

आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हँड सॅनिटाइजरमध्ये 70 ते 80 टक्के अल्कोहोल असणे आवश्यक आहे. अशा सॅनिटायझरचे उत्पादन करताना आरोग्याच्या दृष्टीने काही बाबीकडे लक्ष द्यावे लागते. तसेच त्यासाठी विशेष प्रक्रिया केली जाते. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा वापर केल्यावर हात पूर्णपणे स्वच्छ होतत. तसेच त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, बनावट सॅनिटायझरमध्ये या प्रक्रिया केलेल्या नसतात.

टॉयलेट पेपर चाचणी

सॅनिटायझरची गुणवत्ता तपासण्यासाठी आपण टॉयलेट पेपर किंवा टिश्यू पेपरचा वापरू शकता. यासाठी पेनच्या सहाय्याने कागदावर एक लहान वर्तुळ बनवा. हे वर्तुळ कागदाच्या मध्यभागी बनवा. वर्तुळावर हँड सॅनिटायझरचे काही थेंब टाका. जर या वर्तुळात शाई पसरली तर आपले सॅनिटायझर बनावट असून हे सॅनिटायझर तुमचे हात पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम नाही. हँड सॅनिटायझर चांगल्या दर्जाचे असेल तर या वर्तुळात शाई अजिबात पसरणार नाही.

हेअर ड्रायर चाचणी

हँड सॅनिटायझरचे एका वाटीत पाच ते सहा थेंब काढा. त्यावर हेयर ड्रायरद्वारे हवेचा झोत सोडा. हँड सॅनिटायझर चांगल्या दर्जाचा असल्यास 3 ते 5 सेकंदात सुकून जाईल.  हँड सॅनिटायझर बनावट असेल तर त्याला सुकण्यास वेळ लागले किंवा तो वाटीतच राहील.

पीठाची चाचणी

हँड सॅनिटायझरची चाचणी तुम्ही गव्हाच्या पीठानेही करू शकता. एका वाटीत 1 चमचा पीठ घ्या. या पिठात तीन-चार थेंब सॅनिटायझर टाका. त्यांना एकत्र करून मळण्याचा प्रयत्न करा. मळताना पिठाचा गोळा तयार झाला तर हँड सॅनिटायझर बनावट आहे. तसेच पीठ मळले गेले नाही तर तुम्ही हँड सॅनिटायझरचा दर्जा चांगल्या आहे, असे दिसून येते.

आपली प्रतिक्रिया द्या