‘हाय रिस्क’ गटातील रुग्णांच्या चाचण्या खासगी प्रयोगशाळेत होणार; कोरोनाचे निदान लवकर होण्यासाठी पालिकेचा निर्णय

386

कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या हाय रिस्क गटातील रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अधिक लवकर मिळाल्यास पुढील औषधोपचार जलद गतीने करणे शक्य व्हावे, यासाठी अशा व्यक्तींची चाचणी खासगी प्रयोगशाळांत करायला मुंबई महानगरपालिकेने परवानगी दिली आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी गुरुवारी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिका सर्वस्तरीय प्रयत्न सातत्याने करीत आहे. महापालिकेच्या याच प्रयत्नांमुळे खासगी प्रयोग शाळांमधून ‘करोना‌ कोविड 19’ची तपासणी करण्यास यापूर्वीच सुरुवात झाली असून या प्रयोगशाळाद्वारे संशयित व्यक्तींच्या घरून वैद्यकीय नमुने गोळा करण्याची कार्यवाहीदेखील सुरू आहे. मात्र, महानगरपालिकेच्या स्तरावर संकलित होणाऱ्या व्यक्तींच्या नमुन्यांची चाचणी ही केवळ

महापालिकेच्या प्रयोगशाळांमध्ये केली जाते. या प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या मोठी आहे. तसेच या प्रयोगशाळा प्रामुख्याने दक्षिण व मध्य मुंबईत असल्यामुळे उपनगरातील संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्याबाबत मर्यादा येऊ शकतात. यामध्ये घरच्याघरी विलगीकरण पद्धतीने राहणाऱ्या संशयित व ‘हाय रिस्क’ गटातील रुग्णांच्या चाचण्यांचाही समावेश आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घरच्या घरी विलगीकरण करण्यात आलेल्या ‘हाय रिस्क’ गटातील रुग्णांच्या चाचण्या या खासगी प्रयोग शाळांमधून करून घेण्यास परवानगी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या