कोरोनामुळे वुहान रुग्णालय संचालकांचा मृत्यू

405

वुहानमधील एका रुग्णालयाच्या संचालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. येथील वुचांग रुग्णालयाचे संचालक लिऊ झिमिंग कोरोनाचे बळी ठरले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 6 रुग्णालय अधिकाऱयांचा मृत्यू झाल्याची नोंद असून 1716 रुग्णालय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. वुहानमधील डॉक्टरांकडे मास्क आणि बॉडीसूटची कमतरता आहे. काही डॉक्टरांमध्ये श्वसनाशी संबंधित लक्षणे दिसत आहेत. मात्र डॉक्टरांच्या कमतरेतमुळे सतत काम करणे गरजेचे आहे.

मृतांचा आकडा 1 हजार 868च्या वर

मंगळवाळी कोरोनामुळे आणखी 98 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत चीनमधील मृतांचा आकडा 1 हजार 868 वर पोहोचला आहे, तर कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 72 हजार 436 इतकी आहे. मृत पावलेल्या 98 जणांपैकी 93 जण हे हुबेईतील असून तीन जण हेनान आणि दोन जण हेबेईतील आहेत. एक हजार 97 जण गंभीर आजारी असून 11 हजार 741 जणांची प्रकृती सध्यातरी स्थिर आहे. हुबेई प्रांतात अजूनही 41 हजार 957 रुग्णांवर उपचार सुरू असून यातील 1 हजार 853 जणांची प्रकृती गंभीर आहे.

13 कोरोनाग्रस्त अमेरिकन रुग्णांवर नेब्रास्का येथे उपचार

जपानच्या योकोहामा किनाऱयावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावरील 13 अमेरिकन नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व अमेरिकन रुग्णांना सोमवारी मायदेशी टेक्सास येथे कडेकोट सुरक्षेत आणि चोख प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आणण्यात आले आहे. या रुग्णांवर आता युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्काच्या विशेष दक्षता विभागात उपचार करण्यात येणार आहेत. डायमंड प्रिन्सेस जहाजावरील 338 अमेरिकन नागरिकांना दोन दिवसांत मायदेशी आणण्यात आले आहे. त्यांची तपासणी करून कोरोनाग्रस्त नागरिकांवर विविध रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. काहींवर कॅलिफोर्निया तर काहींवर नेब्रास्का येथे उपचार करण्यात येणार आहेत. या आजाराच्या फेऱयातून वाचलेल्या नागरिकांना अमेरिकन प्रशासनाने घरी जाऊ दिले आहे. मात्र त्यांना काही काळ वैद्यकीय तज्ञांच्या देखरेखीखाली राहण्यास सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या