#Coronavirus फुफ्फुस मजबूत ठेवायचंय? ‘या’ गोष्टींचे सेवन करणे टाळा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आक्राळविक्राळ रुप घेतले आहे. देशात पहिल्यांदाच एका दिवसात 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून मृतांचा आकडाही 3 हजारांच्या पार पोहोचला आहे. कोरोनाचा आकडा जसा वाढत आहे, तसे लसीकरणही वाढत आहे. मात्र फक्त लसीकरणानेच नाही तर आपण काही घरगुती उपाय आणि काही गोष्टी टाळल्या तरीही स्वत:चा बचाव करू शकतो.

कोरोनापासून वाचायचे असेल तर रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे. शरीर सृदृढ तेव्हाच राहील जेव्हा तुमचे फुफ्फुस योग्य पद्धतीने काम करत असेल. कारण फुफ्फुसातून फिल्टर होऊनच संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळतो. परंतु खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही फुफ्फुसावर परिणाम होऊ शकतो आणि शारिरीक व्याधी जडू शकतात. थोडे चालल्याने किंवा अल्पशा परिश्रमाणे देखील धाप लागत असेल तर समजून जा की तुमचे फुफ्फुसं कमकुवत झाली आहेत. त्यामुळे वेळीच फुफ्फुसांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी काही गोष्टींपासून चार हात लांब राहणेच योग्य आहे. चला तर याबाबत जाणून घेऊया…

प्रक्रिया केलेले मांस

प्रक्रिया केलेले मांस चांगले जास्त दिवस ताजेतवाणे रहावे यासाठी नाइट्राइट नावाच्या एका तत्वाचा वापर केला जातो. असे मांस भक्षण केल्याने फुफ्फुसाला सूज येऊन ते ताणले जाऊ शकतात, असे एका संशोधनात समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रक्रिया केलेल्या मांसाचे सेवन शक्यतो टाळा.

साखरयुक्त पेयं

तरुणांवर केलेल्या एका संशोधनानुसार आठवड्यातून पाचहून अधिक वेळा साखरयुक्त पेयांचे (कोल्डड्रिंक्स) सेवन केल्याने लिव्हरवर वाईट परिणाम दिसून आला. यामुळे तुम्हाला दम्याचा आजारही होऊ शकतो. तसेच धुम्रपान आणि साखरयुक्त पेयं यांचे संयुक्तीक सेवन फुफ्फुसांसाठी घातक असल्याचे समोर आले.

तळलेले खाद्यपदार्थ

जास्त तळलेले खाद्यपदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे श्वसनासंबंधी आजार बळावू शकतात. यामुळे फुफ्फुसांवर अतिरिक्त दबाव पडून त्यावर ताण येऊ शकतो. तसेच याचा ह्रदयावरही वाईट परिणाम दिसून आला आहे. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कमीतकमी तळलेले पदार्थ खा.

कोरोनातून बरे झाल्यानंतरचा अशक्तपणा दूर करायचाय? करा ‘हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या…

दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, पनीर इ. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे निरोगी आरोग्यासाठी चांगले असते. मात्र याचे अतिरिक्त आणि अवेळी सेवन करणे घातक असून यामुळे कफ बळावू शकतो. दुधामध्ये कॅसोमोर्फिन नावाचे तत्व आढळते आणि यामुळे कफची समस्या निर्माण होते.

आंबट पदार्थ

आंबट पदार्थांचे सेवन केल्याने अॅसिडिटीची समस्या निर्माण होते. अॅसिडिटीमुळे फुफ्फुसांचे रोग बळावतात. त्यामुळे आंबट पदार्थांचेही मोजून-मापून सेवन करा.

‘या’ गोष्टी नक्की करा

– फुफ्फुस मजबूत ठेवण्यासाठी दररोजच्या आहारात लसूण नक्की ठेवा.
– दररोज तुळशीची पाने खाल्ल्यानेही फुफ्फुस निरोगी राहते
– फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी श्वासोश्वासाचे व्यायाम नक्की करा.

#Coronavirus खोकताना ‘ही’ 5 लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका, जीवावर बेतू शकते

आपली प्रतिक्रिया द्या