तबलीगी जमातीतील लोकांना आपण दहशतवाद्यांसारखी वागणूक द्यायला हवी – व्ही.के. सिंह

1719

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या रुगांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निजामुद्दीन तब्लिगी ए- जमातीच्या मेळाव्यामुळे कोरोना देशभर पसरला. अशातच ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलताना केंद्रीय मंत्री आणि गाझियाबादचे खासदार व्ही.के.सिंह म्हणाले आहेत की, तबलीगी जमातीचे लोक जोपर्यंत गाझियाबादमध्ये पोहोचले नव्हते तोपर्यंत तेथील परिस्थिती ठीक होती. ही एक विकृत मानसिकता असून यामधून बाहेर येण्याची गरज आहे. आपण यांना वाचून अधिक संसर्ग पसरण्याचा प्रयत्न करत आहोत. ही दहशतवादी घटना असून यांना दहशतवाद्यांत प्रमाणेच वागणूक द्यायला हवी.

ते पुढे म्हणाले की, जे आपल्याला तबलीगी म्हणवतात आणि इस्लामच्या उपदेशाचा प्रचार करतात. जर ते डॉक्टर आणि परिचारकांशी गैरवर्तन करीत असतील तर ते इस्लामचे खरे अनुयायी नाही. इस्लाममध्ये असे काही नाही की तुम्ही अशा ढोबळ गोष्टी करता. अशी कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. योगीजींनी याच्या विरोधात रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) लावण्याचे सांगितले आहे. जोपर्यंत आपण कठोर कारवाई करत नाही, तोपर्यंत यांना धडा मिळणार नाही.

दरम्यान, देशभरात आतापर्यंत 5734 लोकांना कोरोना विषाणूंची लागण झालेली आहे. यामध्ये तबलीगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 669 लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे. ज्यातील 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे.

आपली प्रतिक्रिया द्या