राज्यातील 125 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

1595

राज्यात गुरुवारी कोरोनाच्या 229 नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 1364 झाली आहे.  कोरोनाबाधित 125 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1142 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 30 हजार 766 नमुन्यांपैकी 28 हजार 865 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर 1364 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत 125 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 36 हजार 533 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 4731  जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

दरम्यान, आज राज्यात 25 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैंकी पुण्यातील 14, मुंबईतील 9 तर मालेगाव आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे.  आज झालेल्या मृत्यूंपैकी 15 पुरुष तर 10 महिला आहेत. आज झालेल्या 25 मृत्यूंपैकी 12 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर मुंबईत निधन झालेल्या एका महिलेचे वय 101 वर्षे आहे. 11 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 21 रुग्णांमध्ये (84 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील-

 • मुंबई                876 (मृत्यू 54)
 • पुणे  मनपा        181 ( मृत्यू 24)
 • पुणे (ग्रामीण)              06
 • पिंपरी चिंचवड मनपा   19
 • सांगली                   26
 • ठाणे  मनपा             26  (मृत्यू 03)
 • कल्याण डोंबिवली मनपा  32  (मृत्यू 02)
 • नवी मुंबई मनपा  31  (मृत्यू 02)
 • मीरा भाईंदर        04 (मृत्यू 01)
 • वसई विरार मनपा  11 (मृत्यू 02)
 • पनवेल मनपा              06
 • ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू 1) प्रत्येकी 03
 • नागपूर                 19 (मृत्यू 01)
 • अहमदनगर मनपा    16
 • अहमदनगर ग्रामीण  09
 • उस्मानाबाद, अमरावती मनपा (मृत्यू 2), यवतमाळ, रत्नागिरी (मृत्यू 2)  प्रत्येकी  04
 • लातूर मनपा          08
 • औरंगाबाद मनपा   16 (मृत्यू 01)
 • बुलढाणा                      11 ( मृत्यू 01)
 • सातारा                06 (मृत्यू 01)
 • अकोला                            09
 • कोल्हापूर मनपा    05
 • मालेगाव                     05   (मृत्यू 01)

उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशिम, बीड, सिंधुदुर्ग प्रत्येकी 1 (मृत्यू 1 जळगाव )

एकूण- 1367 त्यापैकी 125 जणांना घरी सोडले तर 97 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4261 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 16 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या