कोरोनाच्या रुग्णांसाठी सानपाड्यात शिवसैनिकांचे रक्तदान

611

कोरोनाच्या रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शिवसेनेच्या वतीने सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्त्दान शिबिराला परिसरातील शिवसैनिकांचा आणि नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात आले. वाशी येथील महापालिका रुग्णालयातही आवश्यकतेनुसार शिवसैनिक दररोज रक्तदान करीत आहेत.

सानपाडा येथील केमिस्ट भवनमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक रक्तपेढीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिलिंद सुर्यराव यांच्या वतीने आज रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरातून सुमारे 100 बाटल्या रक्ताचे संकलन करण्यात आले. शिबिरामध्ये रक्तदात्यांची गर्दी होऊ नये, यासाठी सर्वांना वेगवेगळी वेळ देण्यात आली होती. प्रत्येक खुर्चीमध्ये एक मीटरचे अंतर ठेवण्यात आले होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख शिरीष पाटील, शाखाप्रमुख बाबाजी इंदोरे, अजय पवार, मनोज जकाते यांनी विशेष परिश्रम घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या