अत्यावश्यक सेवेतील वाहनातून बेकायदेशीर वाहतूक केल्यास कारवाई करणार – जिल्हा पोलीस अधीक्षक

527

अत्यावश्यक सेवांतर्गत वाहतुक करणारे वाहनचालक यांनी अशी माल वाहतुक करीत असताना त्यांचे वाहनातून कोणत्याही प्रकारची अवैध प्रवासी वाहतुक करु नये,असे जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ.प्रविण मुंढे यांनी आवाहन केलेले आहे. अशा प्रकारे कोणी प्रवासी वाहतुक करताना आढळून आल्यास त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा डॉ. मुंढे यांनी दिला आहे.

शासनाने कोरोना विषाणूचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासुन लागू करुन, खंड 2,3 व 4 मधिल तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्रात मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरील जिल्ह्यातुन प्रवेश करीत आहेत व त्यामुळे करोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्रात होण्याची शक्यता आहे. त्याकरीता जिल्ह्रातील जनतेच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करण्े आवश्यक झाले असल्याने रत्नागिरी जिल्ह्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरीकांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्राच्या सर्व सिमा जिल्ह्रात प्रवेशासाठी व जिल्हयातून बाहेर जाणेकरीता बंद करण्यात आलेल्या आहेत.

रत्नागिरी जिल्हांतर्गत व रत्नागिरी जिल्हयातून इतर जिल्ह्रामध्ये जाण्यासाठी तातडीच्या वैद्यकिय व इतर अतिविशेष कारणास्तव परवानगी मिळणेकरीता “ई-पास” ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा अंतर्गत जिल्हयामध्ये व जिल्हयाबाहेर माल वाहतुक करण्याकरीता शासनाने माल वाहतुकीस परवानगी दिलेली असल्याने माल वाहतुकीसाठी “ई-पास” मिळण्याकरीता कोणीही अर्ज करण्याची आवश्यकताच नाही. तसेच पत्रकार, सरकारी अधिकारी/कर्मचारी, कोरोना संदर्भात सेवा देणारे तसेच वैदयकिय सेवा देणारे सरकारी/खाजगी डॉक्टर व त्यांचे Paramedical Staff यांनाही आवश्यकता नाही असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या