कोरोना – व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोनिया गांधींनी नेत्यांशी साधला संवाद

584

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधला आहे. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘देश आणि आपल्यासाठी ही सर्वात मोठी संकटाची घडी आहे. अशा परिस्थितीत अशा प्रकारची बैठक पहिल्यांदाच घेण्यात येत आहे. मला आपल्या सोबत चर्चा करायची आहे आणि या परिस्थितीवरील प्रश्न आणि त्यावरील उपाय योजना आपल्याकडून जाणून घ्यायच्या आहेत.’, असं त्या काँग्रेस नेत्यांशी बोलताना म्हणाले आहेत.

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या की, देश कोरोना महामारीला रोखण्यासाठी लढा देत आहे. या लढाईत आम्हीही पूर्णपणे आपली भूमिका बजावण्यास तयार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक राज्यात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गेल्या काही आठवड्यांपासून देशवासीयांच्या सेवेत गुंतले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आणि म्हणाल्या, ‘लॉकडाऊन सुरू असताना जे गरीब आपापल्या गावी परतले आहेत अशा लोकांना संकटकालीन परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मदत करण्याचे कार्य केले आहे. आजही देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांच्या मदतीस स्वतःला झोकून दिले आहे. तुमच्या सर्वांच्या समर्थनासाठी मी तुमची आभारी आहे.’

देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, लॉकडाऊन मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडणार आहे. आधीपासूनच अर्थव्यवस्था संकटात होती. आता या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. या परिस्थितीसाठी आपल्याला तयार रहायला हवं. जनतेच्या दुःखात जनतेला साथ द्यायला हवी आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला हवे, असं सोनिया गांधी म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या