चीनमध्ये 1700 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 6 जणांचा मृत्यू

697
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर 63 हजारहून अधिक लोकांना लागण झाली आहे. या रुग्णांवर अहोरात्र उपचार सुरू आहेत. वैद्यकीय कर्मचारी सुट्ट्या न घेता तासन्तास काम करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे आतापर्यंत 1700 वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे. चीनच्या वैद्यकीय विभागाने ही माहिती दिली आहे.

काही दिवसांपूर्वी चीनमधील एका नर्सचा व्हिडीओ समोर आला होता. ही नर्स कोरोना व्हायरसवरील रुग्णांसाठी काम करते. गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या घरी देखील गेली नव्हती. त्यामुळे तिची मुलगी तिला भेटायला रुग्णालयात आली होती. मात्र या मायलेकींना एकमेकींना जवळ घेऊन भेटताही आले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या