विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा; सर्वेच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

507
supreme-court

मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या विद्यापीठातील अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर गेला आहे. याप्रकरणी सर्वेच्च न्यायालयातील सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र आणि दिल्ली राज्यातर्फेच सर्वेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले असून इतर राज्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ही सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने 14 ऑगस्टपर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी अंतिम वर्षांच्या परीक्षा घ्याव्यात, अशी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी)जाहीर केली होती. परंतु अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करावा, या मागणीसाठी युवा सेनेतर्फे सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. युवा सेना प्रमाणेच दिल्लीसह इतर राज्यांनी आणि तेथील विद्यार्थ्यानी देखील परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाला सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेसंदर्भात सर्वेच्च न्यायालयाचे न्यायधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यावेळी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीने यासंदर्भात सर्वेच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. या प्रतिज्ञापत्रांवर प्रतिक्रिया देण्यासाठी न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना वेळ दिला असून आता शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या