‘केईएम’मधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गैरसोयी दूर करा! – म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनिनची मागणी

405

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असताना केईएम रुग्णालयात आरोग्य सेवेचे काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप म्युनिसिपल नर्सिंग अँड पँरामेडिकल स्टाफ युनियन, मुंबईने केला आहे. त्यामुळे प्रशासनाने या गैरसोयी दूर करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गंभीरपणे ताातडीने कार्यवाही अशी मागणी युनियनने केली आहे.

पालिकेच्या केईएम रुग्णालयात कक्ष क्रमांक 4, 4ए, 20, 20ए, कॅज्यूल्टी, कोविड ओपीडी इत्यादी ठिकाणी कोविड संशयित व संसर्गित रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे युनियनने म्हटले आहे. याबाबत सहाय्यक सरचिटणीस रंजना आठवले यांनी केईएम प्रशासनाला निवेदन दिले आहे. यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुढील बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहे. यामध्ये, काही ठिकाणी डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांना देण्यात आलेली संरक्षक साधने पीपीई समान दर्जाची नाहीत. त्यात भेदभाव केला आहे. हे पूर्णपणे अनुचित आहे. असल्याचे युनियनने म्हटले आहे. कोविडबाधित रूग्णाचा म्रुत्यु झाल्यास बॉडी कक्षातून च नातेवाईकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे म्रुतदेह 10/12 तास कक्षात राहतात. त्याबाबत पर्यायी व्यवस्था व्हावी असेही युनियनने निदर्शनास आणून दिले आहे.

अशा आहेत इतर मागण्या

– कोविड संशयित रुग्ण ठेवलेल्या कक्षात पीपीई दिलेले नाहीत. एन95 अथवा सर्जिकल मास्क नाहीत. संशयित रुग्णांपैकी अनेक पाँझिटीव असल्याचे रीपोर्ट आले आहेत. म्हणजे तेथील अनेक कर्मचारी संरक्षित साधनांच्या अभावी रुग्णांच्या निकट संपर्कात आल्याने बाधित झाले असल्याची शक्यता आहे. परंतु मागणी करूनही त्यांची कोविड टेस्ट न करताच त्यांना ड्यूटी करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका आहे. म्हणून तेथे कार्यरत सर्वच कर्मचाऱ्यांची टेस्ट करण्यात यावी.
– कामगार आणि परीचारीकांना कोविड कक्षात काम करताना घ्यायची काळजी व संरक्षक साधने वापरण्याची योग्य पद्धत याबाबत योग्य प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
– केईएम मधील कोविड कक्षात तसेच सेवन हिल्स आणि अँक्वर्थ येथे पाठवण्यात येणाऱ्या परीचारीकांचे रोटेशन ठरवून त्यांना तशी पूर्वसूचना देण्यात यावी. सेवाज्येष्ठता यादीनुसार ज्युनिअर पासून हे रोटेशन लावावे. परंतु गरोदर परीचारीका व स्तनदा माता यांना वगळण्यात यावे. तसेच अन्य गंभीर आजार असलेल्या परीचारीकांना कोविड रुग्ण असलेल्या ठिकाणी ड्यूटी लावू नये.

आपली प्रतिक्रिया द्या