एसटीच्या चालक-वाहकांचे वर्गाचे पगार लवकरच

कोरोना जागतिक संकटाच्या पार्श्र्वभूमीवर राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळातील कार्यालयीन तसेच प्रशासकीय अधिकारी वर्गाचे पगार झाले असून उर्वरित कर्मचारी वर्गाचे पगार टप्प्या टप्प्याने होणार आहेत. एसटीचे राज्य भरात 250 डपो असून एक लाख कर्मचारी असून सर्वांच्या वेतनावर सुमारे 340 ते 380 कोटी रुपये खर्च होतात अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुर्गमातील दुर्गम आणि गाव खेड्यात  गावखेड्यापर्यंत पोहचलेल्या आणि ग्रामीण भागातील खरीखुरी जीवन वाहिनी असलेल्या एसटीचे आर्थिक गणित सध्याच्या परिस्थितीत बिघडले आहे. कोरोना साथीच्या संकटामुळे सध्या अत्यावश्यक बाब म्हणून तीनशे कर्मचार्यांद्वारे साधारण हजार फेर्या सुरू असल्याचे एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी सांगितले.

1 तारखेचा पगार असा आला..

एसटी महामंडळाने आपल्या कडील राखीव 260 कोटींच्या निधीतून मध्यवर्ती कार्यालयासह काही विभागीय कार्यालयीन कर्मचारी वर्गाचे एक तारखेचे पगार काढले आहेत. दर महिन्याच्या 7 तारखेला होणारे डेपोचे तसेच चालक आणि वाहक वर्गाचे पगार झाले नाहीत. एसटी प्रशासनाने वित्त सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. निधीची उपलब्धता होताच बुधवार किंवा गुरुवारी पगार होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोरोना संकटाने एसटीचे हुकमी असे उन्हाळी सुटी हंगामाचे उत्पन्नही बुडाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या