घरे, छोटे व्यवसाय आणि अॉटो रिक्षा यांच्या कर्जावरील बँक ईएमआयला स्थगित केले जावे, नवाब मलिक यांची मागणी

3600

घरे, छोटे व्यवसाय, ऑटो रिक्षा इत्यादींसाठी घेतलेल्या कर्जावरील बँक ईएमआय सध्याच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर महिन्यांसाठी स्थगित केले जावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पेमेंट्सचे वेळापत्रक निश्चित केले पाहिजे आणि आरबीआयने बँकांना त्वरित तसे करण्याची सूचना केली पाहिजे असेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे. शिवाय केंद्रसरकारने जाहीर केलेल्या रिलीफ पॅकेजने शहरी, गरीब आणि असंघटित कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांचेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे असेही नवाब मलिक यांनी ट्वीट करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या