माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग, मृत्यू दर कमी होईल – मुख्यमंत्री

‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले. कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ,त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील यावेळी बैठकीत सहभाग घेतला.

महाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान

यावेळी पंतप्रधानांनीदेखील महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या 20 जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.

दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणार

मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकार करीत असलेल्या काही महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव घेतले जातात.रॅपिड एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, औषधांची उपलब्धता ठेवली आहे, दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवित आहोत अशी माहिती दिली

टेलिआयसीयू राज्यात सर्वत्र

राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलिआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्व राज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्सिजन उत्पादन व वितरणावर नियंत्रण हवे

राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत, आम्ही न थकता लढतो आहोत आणि हरणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे.

लस पुरवठ्याचे नियोजन हवे

लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी तसेच या लशीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चष्म्याच्या सवयीचे उदाहरण

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले की, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार, तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.

पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असे सांगितले.

 • माझे कुटुंब, माझी जबाबदारी : 26% घरांना पथकांनी भेटी दिल्या
 • राज्यात 55 हजार टीम्स तयार करण्याचे निश्चित केले होते. मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे 59 हजार टीम्स तैनात.
 • मोहीम सुरु झाल्यापासून राज्यात 70 लाख 75 हजार 782 घरांना भेटी दिल्या. (26% घरी भेटी झाल्या) 2.83 लाख नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण झाले.( 18 % कव्हर)
 • 4824 कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती तसेच 7 लाख 54 हजार कोमॉर्बिड लोक आढळले.
 • कोरोना काळात राज्य सरकारने काही खूप चांगली पावले उचलली आहेत.
 • राज्यातील सर्वच नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
 • खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले
 • चाचण्यांचे दर नियंत्रित केले.
 • तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स तयार केला. जिल्ह्यातील डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले.
 • गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या
 • ऑक्सिजनचे उत्पादनही आम्ही नियंत्रित केले आहे. एकूण ऑक्सिजन उत्पादनाच्या 80 टक्के पुरवठा आता मेडिकलसाठी व 20 टक्के पुरवठा उद्योगांसाठी करणे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे
 • ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे.
 • ऑक्सिजन उपलब्धतेसाठी व येणाऱ्या अडचणींसाठी नियंत्रण कक्ष
 • गेल्या महिन्यात राज्यात 18 RTPCR चाचणी प्रयोगशाळा सुरु झाल्या. सध्या राज्याची चाचणी क्षमता 80 हजार चाचण्या इतकी आहे.
 • आयसीएमआरने निश्चित केलेल्या 140 दर दशलक्षपेक्षा जास्त म्हणजे 677 चाचण्या केल्या जातात
 • ऑगस्ट महिन्यात दर दिवशी 65 हजार चाचण्या होत असत.
 • लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव घेतले जातात.Rapid Antigen Test निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव RTPCR चाचणीसाठी पाठविला जातो
 • RTPCR चाचणी कीट अतिशय स्पर्धात्मक किंमतीत खरेदीस सुरुवात

बेड्स उपलब्धता

 • मार्च 2020 मध्ये 7722 बेडस,आयसीयू बेडस 3091 आणि 1143 व्हेंटिलेटर्स
 • आज एकूण उपलब्ध बेडची संख्या 3.60 लाख एवढी आहे.
 • राज्यात क्वारंटाईनसाठी 353 संस्थामध्ये 16,192 खाटांची सोय होती.
 • सध्या 1010 संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 1,24,284 खाटा उपलब्ध आहेत

राज्याचे अर्थचक्र वेगाने सुरु

 • विकेल तेच पिकेलमुळे शेतकऱ्यांना लाभ : शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरेल आणि त्यातून शेतकरी चिंतामुक्त होईल,
 • 19,450 कोटी कर्जमुक्ती- 31.89 लाख कर्जखात्यांना रू 19 हजार 450 कोटी
 • कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगांना अधिक प्रोत्साहन
 • महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET)
 • विक्रमी कापूस खरेदी
 • ई-पीक पाहणी मोबाईल ॲप: नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे पारदर्शकता, गतिमानता आणि अचूकता. एकाच वेळी 240 हून अधिक पिकांची माहिती
 • शिवभोजन – 1 कोटी 84 लाख थाळ्या वाटप
 • रोहयोची कामे सुरु
 • निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मदत: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना मिळून एकूण रुपये 623.94 कोटी इतकी रक्कम मदत म्हणून वाटप
 • विदर्भातील पूर स्थिती : या पूर परिस्थितीमुळे बाधित नागरिकांना तातडीने मदत देण्यासाठी आम्ही 16 कोटी 48 लाख 25 हजार रुपये निधी तातडीची आणि सुरुवातीची मदत म्हणून दिला आहे.
 • सुमारे 6 हजार जणांना महाजॉब्सद्वारे नोकरी
 • अनलॉक प्रक्रियेनंतर 95 टक्के उद्योग सुरु
 • सर्वसामान्यांना घरासाठी पाऊले: 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिकांसाठी स्वतंत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय.
 • समृद्धीचे काम वेगाने सुरु: ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे काम वेगाने सुरु करण्यात आले आहे. महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या 24 टाऊनशिपची योजना तयार होत आहे.
 • दूध भुकटी आदिवासी मुले आणि महिलांना अतिरिक्त दुधापासून तयार झालेली भुकटी 6 लाख 51 हजार मुलांना तसेच 1 लाख 21 हजार गरोदर, स्तनदा मातांना 1 वर्षाकरीता मोफत देणे सुरु .
 • 100 टक्के खावटी अनुदान: गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली खावटी योजना सुरु करण्यात आली असून 100 टक्के अनुदान म्हणून २००० रुपये रोख रक्कम आणि 2000 रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देत आहोत.

शाळा बंद पण शिक्षण सुरू

 • गुगल क्लास रुम/ तसंच टाटा स्काय, जिओ, दिशा एप या माध्यमांवरही विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे.
 • राज्यातील परिक्षा प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन

पर्यटनाला चालना – ईज ऑफ डुईंग बिझनेसअंतर्गत हॉटेल व्यवसायासाठी परवानग्यांची संख्या कमीतकमी करण्याचा प्रयत्न आहे. / साहसी पर्यटन

मुंबईत विस्तीर्ण जंगल: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी महोत्सव

महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचतगटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूने ‘ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ सुरु केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या