मदतनिधी नाट्याचा क्लायमॅक्स; निर्माता संघातील आणखी 10 सदस्यांचा राजीनामा

946

मराठी नाट्यव्यावसायिक निर्माता संघाच्या मदतनिधी वाटपाचा वाद आता चांगलाच चिघळलाय. मदतनिधीचे वाटप घटनेला धरून झाले नसल्याचा आरोप करत अध्यक्ष, उपाध्यक्ष खजिनदारांनी आधीच राजीनामे दिलेले असताना आज आणखी 10 सदस्यांनी प्राथमिक सदस्यत्काचा राजीनामा दिला. लता नार्वेकर, श्रीपाद पद्माकर, नंदू कदम, राकेश सारंग, अनंत पणशीकर, चंद्रकांत लोहोकरे, सुनील बर्के, प्रशांत दामले, महेश मांजरेकर, दिलीप जाधक अशी या सदस्यांची नावे आहेत. या सदस्यांनी निर्माता संघातील एकाधिकारशाही विरोधात तोफच डागली आहे आणि मदतनिधी नाटय़ाचा क्लायमॅक्स समोर आणला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे थिएटर बंद झाले आणि निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर निर्मात्यांना मदतनिधी देण्यावरून मतभेद होऊन विद्यमान अध्यक्ष अजित भुरे, उपाध्यक्ष विजय केंकरे आणि खजिनदार वैजयंती आपटे यांनी नुकताच राजीनामा दिला. त्यानंतर निर्माता संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. गरजूंऐवजी इतरांनीच मदतीचा लाभ घेतल्याची टीका करत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मदतनिधीचे लाभार्थी

संतोष शिदम, भालचंद्र नाईक, अनुराधा वाघ, देवेंद्र पेम (नाटक- प्लॅंचेट, ऑल द बेस्ट) जनार्दन लवंगारे, संदीप विचारे (दर्या भवानी) सुशील आंबेकर, दिनेश पेडणेकर (नाटक – सावित्रीबाई माझी माय, अश्रूंची झाली फुले) संतोष कोचरेकर (नाटक- कुसुम मनोहर लेले) प्रदीप कबरे (नाटक- प्रायोगिक खिडकी) गोपाल अलगिरी, राजन केलणकर, प्रदीप शिंपी, आनंद म्हसकेकर (नाटक- वंडर गर्ल) दीपक नलाकडे, श्रीकांत तटकरे (नाटक विच्छा माझी पुरी करा) अरुण होर्णेकर, राहुल भंडारे (नाटक अलबत्या गलबत्या निम्मा शिम्मा राक्षस, इब्लिस) संजीवनी जाधव, शेखर दाते, गोविंद चव्हाण (नाटक हिमालयाची सावली) आनंद नांदोसकर, चारुदत्त देवचक्के, सुरेंद्र दातार, कल्पिता तळपदे, ऋजुता चव्हाण, ऋषिकेश घोसाळकर, सुरेश भोसले.

मदत निधीला विरोध नव्हता, तो देताना त्याच्या कायदेशीर बाबी तपासून बघा, नियमात बसतंय का बघा, एवढं आमचं म्हणणं होतं. कोरोनाच्या संकटात ज्यांची नाटकं आली, त्या निर्मात्यांना जास्त फटका बसला. त्यांनी जाहिरातींकर, प्रोडक्शनवर खर्च केला होता, त्यांचं बुकिंग गेलं, अशा निर्मात्यांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. जुन्या निर्मात्यांनी वृद्ध, शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या सदस्यांसाठी राखीक ठेवलेला हा निधी ज्यांची नाटकं काही वर्षे रंगमंचाकर आलेलीच नाहीत, त्यांना देणे कितपत योग्य? या मनमानी कारभाराविरोधात नाराजी आहे. – लता नार्वेकर, निर्माता

ज्या कारणासाठी निधी ठेवला होता, तो असा नियमबाह्य रीतीने काटणं योग्य नाही. सदस्याला त्याची खरंच गरज आहे की याची पडताळणी न करता काटणे, तर मला अजिबात पटत नाही. त्यामुळे मी आधी कार्यकारिणी सदस्याचा आणि आता सदस्यत्काचा राजीनामा दिला. दुसरे म्हणजे यांची अरेराकी, निर्माता संघाला विचारल्याशिवाय थिएटरच्या तारखा मिळणार नाहीत किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मला नाटक द्यायचं नाही, असे नवे नियम…अशा या सगळया गोष्टी कशाचा जोरावर आणि का करताय. मला हे पटत नसल्याने मी राजीनामा दिला. – सुनील बर्के

28 पैकी 19 लाभार्थ्यांचे एकही नाटक सध्या रंगमंचाकर नाही

कोविडमुळे आर्थिक नुकसान झालेले गरजू सदस्य म्हणून 28 सदस्यांना प्रत्येकी 50 हजारांचा निधी देण्यात आला. यासाठी एकूण 14 लाखांच्या निधीचे वाटप करण्यात आले. अशा 28 जणांपैकी 19 जणांचे एकही नाटक गेल्या पाच वर्षांत रंगमंचावर आलेले नाही, मग त्यांचे नुकसान कसले, असा सवाल राजीनामा देणाऱया सदस्यांनी केला आहे.

फक्त व्हाॅट्सऍप ग्रुपवर बहुमत

प्रत्येक सदस्यांची सभासद वर्गणी, प्रत्येक प्रयोगामागे घेतली जाणारी ठराविक रक्कम अशा सगळ्यांतून निर्माता संघाने गेल्या 50 वर्षांपासून निधी जमा केलेला आहे. ज्या निर्मात्यांना खरंच गरज आहे, त्यांना निधी देण्याबद्दल कुणालाच हरकत नाही. मात्र अनेक जणांची नाटकं गेल्या पाच कर्षांत रंगमंचाकर आलेली नाहीत. लाभार्थींमध्ये कार्यकारिणीचे काही सदस्यही आहेत, जे घटनेला धरून नाही. तसेच मदतनिधी वाटपाचे बहुमत होण्यासाठी सर्कसाधारण सभा घ्यावी लागते. मात्र इथे फक्त व्हाॅट्सऍप ग्रुपवर बहुमत घेतलं गेले. – अनंत पणशीकर निर्माता, नाट्यसंपदा

आपली प्रतिक्रिया द्या