खासगी रुग्णालयांनी जादा बिल आकारल्यास थेट सनदी अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार

1054

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, खासगी रुग्णालयांनी जादा बिल आकारल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी नेमलेल्या पाच सनदी अधिकाऱ्यांकडे आता रुग्णांच्या नातेवाईकांना थेट ई मेलच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे. त्यासाठी पालिकेने या अधिकाऱ्यांचे मेल आयडी जारी केले आहेत. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा योग्य प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्तीही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना परिणामकारक वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, याकरिता राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा या महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे समन्वयदेखील महापालिकेच्या स्तरावर करण्यात येत आहे. तसेच या 80 टक्के खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी या रुग्णालयाद्वारे केली जात आहे. खासगी रूग्णालयामधील खाटांचे वितरण अधिक प्रभावीपणे होण्यासाठी 5 सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारने नुकतीच केली आहे. यात सनदी अधिकारी मदन नागरगोजे, अजित पाटील, राधाकृष्णन, प्रशांत नारनवरे आणि सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे. आता या अधिकाऱ्यांकडे खासगी रुग्णालये जादा बिल आकारणार नाहीत, याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

1. मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे हॉस्पिटल, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, काॅनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन इस्पितळ आणि एस.आर.सी.सी. हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ईमेल : – [email protected]

2. अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट हॉस्पिटल, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक इस्पितळ आणि पी डी हिंदुजा हॉस्पिटल यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे.
ई मेल : – [email protected]

3. राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती इस्पितळ, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स हॉस्पिटल (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ई-मेल :- [email protected]

4. सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एस आर व्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी इस्पितळ, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ई-मेल : – [email protected]

5. प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ई मेल :- [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या