…तर सार्वजनिक वाहतूक बंद करणार

1705

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करीत आहे. स्वच्छता कामगार, पाणीपुरवठा, वीजपुरवठा यांसह अन्य अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱया कर्मचाऱयांची गैरसोय होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक सुरू आहे. नागरिकांनी गर्दी तसेच गरज नसताना प्रवास टाळावा, अन्यथा सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

चिकनची दुकाने सुरू ठेवा

चिकनच्या माध्यमातून कोरोना पसरतो या अफकेने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. यामुळे चिकन किक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली असून पोल्ट्री क्याकसायिकांना मोठा फटका बसला आहे. मात्र चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही असे पुढे आल्यानंतर आता चिकनची दुकाने सुरू ठेकायला हरकत नाही. चिकनची दुकाने उघडी ठेकताना काळजी घ्या, असे आवाहनही पवार यांनी केले.

संशयित रुग्णांवर बहिष्कार नको

परदेशातून प्रवास करून आलेल्या सर्व नागरिकांकडे संशयाने पाहू नका. कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्ण बरा होऊन घरी परतल्यानंतर त्यांच्यावर कोणी बहिष्कार टाकू नका. सर्वजण आपल्या कुटुंबातील आहेत, असे समजून त्यांना वागणूक देण्याचे आवाहन पवार यांनी केले.

पुढील 15 दिवस महत्त्वाचे

कोरोना क्हायरस रोखण्यासाठी पुढील 15 दिकस फार महत्त्काचे आहेत. कोरोनाचा तिसरा टप्पा तोंडावर आहे. हा तिसरा टप्पा आणि यापुढील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनाकश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेले आदेश पाळावेत. नागरिकांनी हे स्कतŠचे कर्तक्य असल्याचे समजून सहकार्य कराके. तसेच राज्य सरकारने काही निर्णय घेताना त्याची मुदत 31 मार्च सांगितली आहे, परंतु आता पुढील आदेश निघेपर्यंत सरकारकडून दिलेले आदेश पाळाकेत, असे पवार यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या