श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा ‘रक्त संकलनाचा संकल्प’

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या वतीने रक्तदानाबाबत करण्यात आलेल्या आवाहनानुसार रक्ताचा तुटवडा लक्षात घेता श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने रक्त संकलन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुंबई मधे रहाणाऱ्या ज्यांना रक्तदान करण्याची इच्छा आहे त्यांनी आपले नाव श्री सिद्धिविनायक गणपती मंदीरात दुरध्वनीद्वारे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत नोंदवावे. 022-24224438, 022-24223206

रक्तदात्याच्या रहात्या घराच्या जवळ,थेट सोसायटीच्या आवारात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या वतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाची रक्त संकलन व्हॅन पोहचेल, त्यामुळे रक्तदात्याना रहात्या ठिकाणी रक्तदान करता येईल. कृपया गर्दी न करता रक्तदान करावे आणि रक्त संकलन करण्यासाठी सहकार्य करावे असे नम्र आवाहन करण्यात येत आहे – आदेश बांदेकर, अध्यक्ष श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास

आपली प्रतिक्रिया द्या