राज्यात करोना आजाराचा चौथा मृत्यू; 3 नवीन करोना बाधित रुग्ण

1324
corona-virus-new-keral

गुरुवारी राज्यात आणखी 3 कोविड 19 रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 125 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक 65 वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन जनरल्ल हॉस्पिटल वाशी येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक 24 मार्च रोजी दुपारी भरती झाली. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे. आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी  सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या