कोरोनामुळे निवडणूक आयोगाने नियमात केला मोठा बदल, बिहार निवडणुकीवेळी अमलात येणार

बिहारमधील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र ही निवडणूक होण्यापूर्वी निवडणूक आयोगाने नियमात बदल केले आहेत. कोरोनव्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे लोक टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतील. ही सुविधा कोरोनाव्हायरस संक्रमित लोकांमध्ये किंवा ज्यांना संसर्ग झाल्याचा संशय आहे आणि विलगिकर कशात असलेल्या अशा लोकांना देखील ही सुविधा दिली जाईल.

65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक विशेषत: गर्भवती महिलांसह आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या आजारासह दीर्घकालीन आजारानेग्रस्त लोकांसाठी हा व्हायरसस अधिक धोकादायक आहे.

वैद्यकीय तज्ज्ञ आणि सरकार अशा लोकांना बाहेर पडण्यास मनाई करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या