कोरोना झालेल्या महिलेची सुखरूप प्रसूती, कन्या रत्नाला जन्म दिला

947

कोरोनाची बाधा झालेल्या एका महिलेची नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात सुखरूप प्रसूती झाली आहे. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे काल उघड झाले होते. त्यामुळे तिची प्रसूती सुखरूप होण्यासाठी डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते.

घणसोली परिसरात राहणाऱ्या या महिलेला प्रसूतीसाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला कोरोना झाल्याचे काल उघडकीस आले. त्यामुळे तिची प्रसूती सुखरूप करणे हे डॉक्टरांपुढे मोठे आव्हान होते. वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.प्रशांत जवादे आणि प्रसूती तज्ज्ञ डाॅ. राजेश म्हात्रे व त्यांच्या पथकाने हे आव्हान यशस्वीरित्या पेलावले. त्यामुळे त्यांच्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या महिलेने एका गोंडस कण्यारत्नाला जन्म दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या