जालना जिल्ह्यात गरोदर महिलेसह तीन जण पॉझिटिव्ह

294

जालना जिल्ह्यात आज तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले असुन त्यातील दोन अंबड तालुक्यातील कानडगाव येथील तर एक गरोदर महिला जालना शहरालगत असलेल्या इंदेवाडी परिसरातील रंगनाथ नगरातील आहे. सदर इंदेवाडी परिसरातील महिला ही पती, एक मुलगा आणी सासूसोबत वास्तव्यास आहे. ते मूळचे जालना तालुक्यातील जामवाडी येथील असुन शेती व्यवसाय करतात. विशेष म्हणजे सदर महिला गर्भवती असून सर्दी झाल्याने प्रथम एका रूग्णालयात नियमीत तपासणीसाठी गेली होती. ते रूग्णालय केवळ गर्भवती व डिलेव्हरीसाठी असल्याने त्यांनी त्या महिलेला अबड चौफुली स्थित एका मोठ्या रूग्णालयात तपासणीसाठी पाठविले होते. तिथे तपासणी अंती त्या महीलेला निमोनिया झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे तात्काळ तिची रवानगी जिल्हा शासकीय रूग्णालयात करून तिच्या स्वॅबचे नमुने संभाजीनगरला पाठविण्यात आले होते. 8 मे रोजी पाठविण्यात आलेल्या स्वॅबचे अहवाल काल 9 मे रोजी रात्री उशीरा प्राप्त झाले असुन कोरोना असल्याचे समोर आले. त्यामुळे आरोग्य आणि पोलीस यंत्रणा तात्काळ कामाला लागत त्यांनी सदर महिलेच्या पती, मुलगा आणी सासूच्या स्वॅबचे नमुने घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात हलविले. तसेच रंगनाथ नगर परीसर कोन्टेन्मेन्ट झोन घोषीत केला आहे. पुढील 14 दिवस या कॉलनीतील सर्व लोकांची आरोग्य माहिती घेण्यात येणार असून सर्दी किंवा खोकला असणाऱ्याचे स्वॅबचे नमुने घेण्यात येणार आहे. तसेच रक्तदाब, मधुमेह व वयोवृध्द नागरिकांची विशेष नोंद घेण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सोनी यांनी दिली. दरम्यान त्या महिलेची ज्या रूग्णालयात तपासणी करण्यात आले होती, त्या रूग्णालयातील संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या