मुंबईत कोरोनाचे 116 नवीन रुग्ण, पाच जणांचा मृत्यू

1534

महामुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 116 नवीन रुग्ण आढळले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमधील हा एकत्रित अहवाल पालिकेने जाहीर केला आहे.

मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत प्रतिदिन वाढच होत असल्याचे समोर येत आहे. गेला आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा सरासरी 50 पेक्षा जास्त असल्याने काळजीत भर पडली आहे. आज पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये 100 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ओपीडीमध्ये आज एकूण 559 जणांची तपासणी करण्यात आली. आज मृत्यू पावलेल्या पाचपैकीं चार जणांना दीर्घ आजारपण होते तर एक व्यक्ती वृद्ध होती. दरम्यान, पालिकेने मुंबईत 241 कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले असून अशा सर्व ठिकाणी सीसीटीव्ही, पालिकेचा वॉर रूम आणि पोलिसांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येत आहे.

55 रुग्ण कंटेनमेंट झोनमधील

मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या 100 रुग्णांपैकी 55 रुग्ण हे कंटेनमेंट झोनमधील आहेत. पालिकेने कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी जाऊन राबवलेली मोहीम आणि कंटेनमेंट झोनमध्ये उघडलेल्या 20 दवाखान्यात करण्यात आलेल्या तपासणीमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. या दवाखान्यात आतापर्यत 614 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यात 185 जणांचे नमुने संशयित आढळले आहेत. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी आतापर्यंत मुंबईत तब्बल 59 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या