मुंबईत 1201 नवे रुग्ण; 39 जणांचा मृत्यू

651
मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1201 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,269 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 57 हजार 152 वर पोहोचली आहे.
मुंबईतील गेल्या 48 तासांत 39 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4 हजार 935 झाली आहे. मुंबईत कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असून आज 1,269 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 23 हजार 239 वर आली आहे. दरम्यान, मुंबईतील कोरोनाची लागण होण्याचा डबलिंग रेट आता 44 दिवसांवर आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या