शेगांव येथील श्री गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद

वाढत्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेगांव येथील श्री गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. शेगाव येथे ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची दररोज मोठी गर्दी होत असते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्रींचे मंदिर आज रात्रीपासून दर्शनासाठी बंद करण्यात येत आहे. पुढील निर्देशापर्यंत मंदिर बंदच राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, राज्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच नियम न पाळल्यास कडक कारवाई केली केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करताना दिली.

आपली प्रतिक्रिया द्या