मुंबईतील 17 वाहनतळांच्या ठिकाणी होणार कोरोना चाचणी; ‘हायरिस्क’ गटातील रुग्णांची तपासणी होणार

839

कोरोना चाचण्या वेगाने होण्यासाठी आता मुंबईतील 17 सार्वजनिक वाहनतळांच्या ठिकाणी कोरोना चाचणी होणार आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सहायक आयुक्तांना दिले आहे.

वाहनतळांच्या ठिकाणी होणाऱ्या चाचणीसाठी थायरोकेअर, मेट्रोपोलिस, एसआरएल, ईन्फर्न,सबअर्बन डायनोस्टीक प्रआदी योगशाळांची मदत घेण्यात येणार आहे. यामुळे कोरोना संशयितांच्या तपासण्या वेगाने होऊन गरजेनुसार लवकरात लवकर वैद्यकीय मदत सुरू करता येणार आहे. यामध्ये सध्या  सार्वजनिक वाहनतळ भायखळा, काळाचौकी, शिवडी, परळ-शिवडी, आर्टेशिया इमारत, लोअर परळ, इंडिया बुल्स फिनान्स सेंटर, एलफिन्स्टन, कोहिनूर मिल, दादर, एक्सर व्हिलेज, बोरीवली प., विकास प्लाझा,  मुलुंड प., रूणवाल ऑडिटोरियम, मुलुंड प, रूणवाल ग्रीन, नाहूर, कांजूर व्हिलेज, कांजूरमार्ग आर माॅलजवळ, विक्रोळी आदी ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या