कोरोनाचे आज 2608 नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण 47 हजार 190 – आरोग्यमंत्री राजेश टोपे

1257

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 47 हजार 190 झाली आहे. आज 2608 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज 821 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 13 हजार 404 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 32 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 48 हजार 26 नमुन्यांपैकी 2 लाख 98 हजार 696 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 47 हजार 190 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 85 हजार 623 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 33 हजार 545 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 60 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1577 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 40, पुण्यात 14, सोलापूरात 2, वसई विरारमध्ये 1, साताऱ्यात 1, ठाणे 1 तर नांदेड शहरात 1 मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी 42 मृत्यू हे मागील 24 तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 41 पुरुष तर 19 महिला आहेत. आज झालेल्या 60 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 29 रुग्ण आहेत तर 24 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 60 रुग्णांपैकी 36 जणांमध्ये (60 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील : (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

 • मुंबई महानगरपालिका: 28,817 (949)
 • ठाणे: 394 (4)
 • ठाणे मनपा: 27405 (35)
 • नवी मुंबई मनपा: 1778 (29)
 • कल्याण डोंबिवली मनपा: 784 (7)
 • उल्हासनगर मनपा: 145 (3)
 • भिवंडी निजामपूर मनपा: 82 (3)
 • मीरा भाईंदर मनपा: 442 (4)
 • पालघर: 111 (3)
 • वसई विरार मनपा: 499 (15)
 • रायगड: 321 (5)
 • पनवेल मनपा: 295 (12)
 • ठाणे मंडळ एकूण: 36,173 (1039)
 • नाशिक: 115
 • नाशिक मनपा: 105 (2)
 • मालेगाव मनपा: 711 (44)
 • नगर: 53 (5)
 • नगर मनपा: 19
 • धुळे: 17 (3)
 • धुळे मनपा: 80 (6)
 • जळगाव: 290 (36)
 • जळगाव मनपा: 113 (5)
 • नंदूरबार: 31 (2)
 • नाशिक मंडळ एकूण: 1535 (103)
 • पुणे: 312 (5)
 • पुणे मनपा: 4805 (245
 • पिंपरी चिंचवड मनपा: 230 (7)
 • सोलापूर: 22 (1)
 • सोलापूर मनपा: 545 (34)
 • सातारा: 204 (5)
 • पुणे मंडळ एकूण: 6118 (297
 • कोल्हापूर: 206 (1)
 • कोल्हापूर मनपा: 23
 • सांगली: 63
 • सांगली मिरज कुपवाड मनपा: 11 (1)
 • सिंधुदुर्ग: 10
 • रत्नागिरी: 142 (3)
 • कोल्हापूर मंडळ एकूण: 455 (5)
 • संभाजीनगर: 22
 • संभाजीनगर मनपा: 1197 (42)
 • जालना: 54
 • हिंगोली: 112
 • परभणी: 17 (1)
 • परभणी मनपा: 5
 • संभाजीनगर मंडळ एकूण: 1407 (43)
 • लातूर: 64 (2)
 • लातूर मनपा: 3
 • धाराशिव: 29
 • बीड: 26
 • नांदेड: 25
 • नांदेड मनपा: 85 (5)
 • लातूर मंडळ एकूण: 220 (7)
 • अकोला: 31 (2)
 • अकोला मनपा: 342 (15)
 • अमरावती: 13 (2)
 • अमरावती मनपा: 143 (12)
 • यवतमाळ: 113
 • बुलढाणा: 39 (3)
 • वाशिम: 8
 • अकोला मंडळ एकूण: 689 (34)
 • नागपूर: 3
 • नागपूर मनपा: 462 (7)
 • वर्धा: 2 (1)
 • भंडारा: 9
 • गोंदिया: 39
 • चंद्रपूर: 8
 • चंद्रपूर मनपा: 7
 • गडचिरोली: 13
 • नागपूर मंडळ एकूण: 545 (८)
 • इतर राज्ये: 48 (11)
 • एकूण: 47 हजार 190 (1577)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 2345 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 16 हजार 414 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 65.91 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या