हिंदुस्थानचा जलद लसीकरणाचा जागतिक विक्रम, चीन-अमेरिकेला धोबीपछाड

modi-vaccination

देशातील नागरिकांना लसीच्या 10 कोटी मात्रा देत कोविड-19 विषाणूला रोखण्याच्या कामी हिंदुस्थानने अजून एक मैलाचा दगड गाठला आहे. शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंतच्या प्राथमिक अहवालानुसार देशभरात लसीच्या एकूण 10, 12, 84, 282 मात्रा देण्यात आल्या आहेत.

लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षे त्यापुढील वयाच्या लोकांसाठी वाढवत त्याशिवाय या वयोगटासाठी सरकारी व खासगी कामाच्या जागी लसीकरणाची सोय करुन देण्यास मुभा असे अनेक महत्वाचे निर्णय, सहयोग व समन्वयाच्या भूमिकेतून केंद्र व राज्यांनी कोविडच्या विळख्यातून मोलाचे जीव वाचावेत म्हणून घेतले. परिणामकारक औषधोपचार व्यवस्थापनामुळे हिंदुस्थानचा मृत्यूदर जगात सर्वात कमी म्हणजे 1.28% राहिला.

ही बाब “सकल समाज” या भूमिकेची साक्ष देणारी आहे. अफवा आणि एखाद्याच्या फायद्याच्या हेतूने केलेली दिशाभूल याला बळी न पडता लोकांनी लसीबाबतची उदासिनता सोडून कोविड-19च्या उच्चाटनासाठी व्यवस्थापनाला मदतीचा हात दिला. कोविड-19 मुळे देशातील जोखीम असलेल्या अनेक गटांना संरक्षण देणारी व्यवस्था मिळाली तसेच या गटांचे उच्च् स्तरावरून वारंवार पुनरावलोकन व परीक्षण केले जाईल.

लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? जाणून घ्या तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

एकूण 10 कोटी मात्रांचे व्यवस्थापन वेगाने व्यवस्थापन करणारा हिंदुस्थान हा जगातील सर्वात वेगवान देश आहे. 100 दशलक्ष मात्रा देण्यासाठी अमेरिकेने 89 दिवस तर चीनने 103 दिवस घेतले. 85 दिवसात मिळवलेल्या या यशाची इतर देशांशी तुलना करताना हिंदुस्थानचा प्रतिदिन लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे हे महत्वाचे. अमेरिकेने 85 दिवसांमध्ये 92.09 दशलक्ष मात्रा तर चीनने 85 दिवसात 61.42 दशलक्ष मात्रा दिल्या.

pib

एकूण 15,17,260 सत्रात देण्यात आलेल्या 10.12 कोटी मात्रांमध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 90,03,060 आरोग्यकर्मचाऱ्यांचा आणि लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या 55,06,717 आरोग्य कर्मचाऱ्यांचा तसेच लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 99,39,321 कर्मचाऱ्यांचा, लसीची दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवर काम करणाऱ्या 47,28,966 कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 45 ते 59वर्षे वयोगटातील 3,01,14,957 लाभार्थ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील 6,37,768 लाभार्थ्यांचा तसेच पहिली मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 3,95,64,741 लाभार्थ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या 60 वर्षावरील वयोगटातील 17,88,752 लाभार्थ्यांचा समावेश आहे.

शव्यापी लसीकरणाच्या 85 व्या दिवशी रात्री 8 वाजेपर्यंत लसींच्या 29,65,886 मात्रा देण्यात आल्या. प्राथमिक अहवालातील माहितीनुसार यापैकी 26,31,119 लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर 3,34,767 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या