Video – ‘आधी झप्पी, मग पप्पी’ कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहातच नगरसेवकाचे कृत्य, व्हिडीओ व्हायरल

1297
corporator-kissed-kolhapur

कोल्हापूर महानगर पालिकेची सभा आज वेगळ्याच कारणाने गाजली. महापालिकेची सभा सुरू असतानाच भर सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकाने सत्ताधारी काँग्रेसच्या गटनेत्याला जवळ खेचत ‘पप्पी’ घेतल्याने सर्वजण आवाक झाले.

महानगरपालिकेत विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे हे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्याशेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख बसले होते. सभागृहात अभिनंदनाचे ठराव सुरू असतानाच भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. बोलता बोलता कमलाकर भोपळे यांनी भरसभागृहात शारगंधर देशमुख यांना जवळ खेचलं आणि मग सर्वांसमक्ष ‘पप्पी’ घेतली. अचानक झालेल्या याप्रकारामुळे सर्व सभागृहात हशा पिकला. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू होती हे समजले नाही. मात्र सभागृहात या घटनेची उलटसुलट चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे सभागृहात अनेक महिला नगरसेविकाही उस्थित होत्या.

आज महापौरांच्या राजीनाम्यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती आणि त्यावेळी हा प्रकार घडला. सभागृहात अशाप्रकारचे वर्तन योग्य नसल्याचीही प्रतिक्रिया दबक्या आवाजात सुरू होती.

आपली प्रतिक्रिया द्या