Video – चंद्रपुर महानगरपालिकेत 60 लाखांचा भ्रष्टाचार, नगरसेवक पप्पू देशमुख यांचे थाळी वाजवा आंदोलन

चंद्रपुर महानगरपालिकेकडून कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या भोजन, नाश्ता आणि चहापानाच्या खर्चात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. या विरोधात त्यांनी थाळी वाजवा आंदोलन केले आहे.

कोरोना रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर चहानाश्त्यापासून दोन वेळचे जेवण पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यासाठी नागपूरच्या एका जवळच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले. मात्र निविदेत नमूद दरापेक्षा अधिक दराची बिले मंजूर केली जात असून यात सुमारे 60 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आज महापालिकेची आमसभा सुरू असतानाच पप्पू देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसह महापालिकेच्या दारात उभे झाले आणि थाळी नाद करू लागले. महापालिकेत भाजपची सत्ता असून देशमुख हे अपक्ष सदस्य आहेत. हा भ्रष्टाचार उघड करताना त्यांनी पुरावेही सादर केले. या पुराव्यांच्या आधारावर दोषी अधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार करावी, अशी मागणी त्यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या