सुखावणारे कॉटन

उन्हाळ्याच्या तडाख्यात सुती कपडे वापरण्यासारखे सुख नाही… पाहूया देखण्या सुती साडय़ा…

सध्या उन्हाळा चांगलाच सुरू झाला आहे. अंगाची काहिली करणा-या उन्हाळ्यात कोणते कपडे घालायचे, हा मोठा प्रश्न असतो. हा कडक उन्हाळा सहन होईल असा कोणते पर्याय कॉटन कपडय़ांमध्ये पाहायला मिळतो. उन्हाळ्यात सगळ्यात परफेक्ट फॅब्रिक म्हणजे कॉटन.नेहमीच सिंपल आणि एलिगंट लूक असणारी कॉटन साडी उन्हाळ्यात थंडावा देणारी आहे. हलक्या प्रिंटची कॉटन साडी आपल्याला एक वेगळा लूक देऊन जाते. कॉटन साडीवर जंक ज्वेलरी आणि साजेसा मेकअप आपल्याला सर्वापेक्षा “कूल लूक’’ देतो. फिक्या रंगाच्या कॉटन साडया हा देखील उत्तम पर्याय आहे.

कॉटनमध्ये काही ट्रेंडी रंग देखील पाहायला मिळतात.गृहिणी आणि ऑफिसगोअर्ससाठी समर सीझनमध्ये कॉटन साडी हा एक उत्तम असा पर्याय ठरू शकतो. साडी नेसायला आवडत असेल तर या उन्हाळ्यात सुती साडय़ा वापरून बघा. या साडय़ांमध्ये हिरवा, निळा, गुलाबी, पांढरा, जांभळ्यासारखे रंग थंडावा देणारे आहेत. यासोबतच तुम्ही यातले फिकट व गडद रंगही वापरू शकता. या साडीवर जर चार किंवा पाच इंचांचा काठ असेल तर ती आणखी उठून दिसेल तुम्ही गडद आणि हलक्या रंगांचं कॉम्बिनेशन वापरू शकता. यात फुलाफुलांचं प्रिंटही छान दिसेल व त्यावर बीड्सची ज्वेलरी वापरा.

कूल कॉटन
हा सगळीकडे मिळणारा प्रकार. सुती कापड पटकन चुरगळतं पण कडक स्टार्च केलेला प्रकार परिधान केल्यावर खुलून दिसतो. उन्हाळ्यात या कपडयांना भरपूर मागणी असते. निव्वळ कॉटनच्या साडय़ा मग ते गडद रंग असो वा फिकट त्यांना स्टार्च केल्या की खूप छान दिसतात. म्हणून अनेक महिला उन्हाळ्यात

काही महत्त्वपूर्ण प्रकार
जामदानी प्रकारची सुती साडी हे पश्चिम बंगालचे वैशिष्टय असून येथील परंपरेप्रमाणे ही साडी नेसली जाते. संबळपुरी, बोमकल आणि विचित्रपुरी सुती साडय़ा हे ओडिशाचे वैशिष्टय आहे. रंगबेरंगी पदर हे या साडय़ांची खासियत असते. मध्यप्रदेशचे वैशिष्टय असलेल्या चंदेरी साडय़ांमध्ये सुती आणि रेशमी धाग्यांचे सुरेख मिश्रण असते. तसेच, चौकडय़ांचे डिझाईन असलेल्या माहेश्वरी साडय़ा याही सुती किंवा रेशमी धाग्यांच्या मिश्रणापासून बनविल्या जातात. हैद्राबादच्या साडय़ा या प्राचीन, पारंपारिक विणकामाबद्दल प्रसिध्द आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या