श्रीरामपूरात सवा तीन लाखांचे देशी-विदेशी मद्य जप्त

399


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर विभागाची धडक कारवाई केली असून विदेशी व देशी  मद्याचे 74 बॉक्स जप्त करण्यात आले. त्याची किंमत अंदाजे 3,29,184 आहे. आरोपी अशोक  तुकाराम विटनोर यास अटक केली केली आहे.

उपायुक्त प्रसाद सुर्वे तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  नगर पराग नवलकर, नगरचे उपाधीक्षक सी.पी.निकम यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 19 सप्टेंबर रोजी पहाटे 02.00 वाजताच्या सुमारास निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूर व स्टाप यांनी हिंदुस्तान पेट्रोल पंपच्या मागील बाजूस मांजरी शिवार तालुका राहुरी जिल्हा नगर याठिकाणी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार स्टाफ सह दारूबंदी गुन्हा याकामी छापा मारला असता  विदेशी व देशी  मद्याचे 74 बॉक्स आढळले. या गुन्ह्यात आरोपी  अशोक  तुकाराम विटनोर यास अटक केली.  सदर कारवाई ही निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 श्रीरामपूरचे श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2, पी बी अहिरराव दुय्यम निरीक्षक, के यु छत्रे दुय्यम निरीक्षक, ए सी खाडे दुय्यम निरीक्षक, नम्रता वाघ दुय्यम निरीक्षक, कॉन्स्टेबल स्टाफ राजेंद्र कदम, विकास कंठाळे, दीपक बर्डे, प्रवीण साळवे व महिला जवान वर्षा जाधव यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क क्रमांक 2 श्रीरामपूर हे करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या