पिंगळे दाम्पत्यास एकाच वेळी डॉक्टरेट

142

सामना प्रतिनिधी। अंबाजोगाई

शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालयातील प्रा. गणेश पिंगळे व त्यांच्या सुविद्य पत्नी ग्रंथपाल भाग्यश्री केसकर यांना राजस्थान राज्यातील झुझुनूच्या जे.जे.टी. विश्वविद्यालयाने नुकतीच पी.एच.डी. प्रदान केली.

प्रा. गणेश पिंगळे यांनी कॅपं रेटिव्ह स्टडी ऑफ पर्सनॅलिटी ट्रेटस ऑफ हाय अॅन्ड लो अॅकेडामिक अॅचिव्हर्स ऑफ हायर सेकंडरी लेव्हल फ्रॉम अंबाजोगाई ( जि.बीड ) महाराष्ट्र (शिक्षणशास्त्र ) या विषयावर डॉ. राजेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. तर त्यांच्या सुविद्य पत्नी भाग्यश्री यांनी ए स्टडी ऑफ द रोल ऑफ कॉलेज लायब्ररीज इंपॅक्ट फॅक्टर ऑन द स्टुडंटस ऑफ द उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट महाराष्ट्र ( ग्रंथालय, माहिती शास्त्र ) या विषयावर डॉ. गोविंद घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. या संशोधन दरम्यान त्यांना अनेक संस्थांचे मौलिक सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमुद केले.
दोघांनी मिळवलेल्या संयुक्त यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 summary…couple-of-ambajogai-get-doctrate-at-time

आपली प्रतिक्रिया द्या